मंदिरातला भिकारी

Started by sanjay limbaji bansode, January 30, 2015, 10:49:24 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

आज खूप दिवसांनी मंदिरात गेलो
मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडून भीक मागितले
" देवा मला धनवान बनव "
आणि मंदिरा बाहेर निघालो मंदिराच्या पायरीवर एक भिकारी बसला होता मी खाली उतरत असतां तो  माझे पाय धरुन मला भीक मागत होता.
मला त्याची दया आली व मी त्याला दोन रुपए दिले
समोर गेल्यावर माझ्या लक्षात आले की,त्याच्यात अन् माझ्यात फरक काय ?
तो त्या मंदिरात भीक मागायला आला मीही त्या मंदिरात भीक मागायला गेलो.
तो एक हुशार भिकारी होता निदान तो एका माणसाला भीक मागत होता व त्याची मनोकामना हळूहळू का होईना पण पूर्ण होत होती.
आणि मी एक वेडा भिकारी ?

संजय बनसोडे