माझ्या ढगांच्या पल्याड

Started by rickmulik3399, January 30, 2015, 01:15:01 PM

Previous topic - Next topic

rickmulik3399

भिजले अंगण
आल्या पावसाच्या सरी
आठवण तिची
पाणी डोळ्यांच्या कपारी

साठवण माझी
स्वप्नातली परी
हरवलेली बाहुली
माझी मलाच ती बरी

पावसाची नजाकत
काहुर जशी इथे
पोहाचावा ओलावा
मन तिचे रिते

माझ्या ढगांच्या पल्याड
तिचे सुकलेले शेत
तिची अन् माझी गुज
                वा-याच्या भरोश्यात

तिची अन् माझी गुज
                वा-याच्या भरोश्यात

IRA