11.ती….ती.....माझी..........!

Started by bhushanpachpole@gmail.com, January 31, 2015, 02:42:50 PM

Previous topic - Next topic

bhushanpachpole@gmail.com

जी नेहमी हसत असते,
जी कधी कधी चिडते; आणि लगेच शांत होते,
सर्वांना तिची मैत्री हवी-हवीशी वाटते,.......ती...
ती माझी.........................!
तिना..! हसतांना खूप सुंदर दिसते,
रडतांना मात्र लहान मुलगीच असते,
पण ती हसली कि माझ्या आनंदाला सीमा नसते,
असं आमचं दोघांच "विश्वासाच" नात......ती...
ती माझी.........................!
सर्वांचा विचार करणारी,
स्वत:च दु:ख लपवणारी,
मनाच्या गाभाऱ्यात एकटीच दु:ख सोसणारी,
इतरांच्या आनंदात आनंद मानणारी.....अशी.....ती...
ती माझी.........................!
तिला ना....!  जास्त काही हव नसत,
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते,
आणि सर्वांना आनंदी करते..........ती....
ती माझी.........................!
ती प्रेमाच्या आणि मैत्रीच्या तराजूत स्वत:ला तोलते,
मनाच मात्र न ऐकता....
स्वत:लाच दु:खावून घेते..........ती....
ती माझी.........................!
प्रश्न असतो नेहमी तिच्या मनात,
ती चुकत तर नाहीना............?
चूक आणि ती करणारच नाहीना.........ती......
ती माझी.........................!
खूप प्रेम करते (माझ्यावर आणि सर्वांवर)
पण दाखवत मात्र नाही,
तिच्या त्या प्रेमळ मनाचा किनाराच मला दिसत नाही
खूप जीव लावते सर्वांना..................ती...
ती माझी.........................!
म्हणते मला आता प्रेम करायला जमणारच नाही...
(मीही सर आहे....!)
प्रेम कस करावं हे शिकविल्याशिवाय मी राहणार नाही,
कारण त्याशिवाय जग सुंदरच दिसणारच नाही........ती...
ती माझी.........................!
कधी-कधी खोट-खोट हसते,
पण तिथेच ती फसते,
कारण तिच्या Smile सारखी Smile या जगात कुणाकडेच नाही...ती...
ती माझी.........................! ||9||
तिचे तीन भावंड तिच्या सोबतच असतात,
"जाऊद्या, सोडा, असचं" हि त्यांची नावं.....
मला ते फसवतात....., मीही तिच्यासाठीच फक्त हसतो आणि फसतो
कारण अशी ती.....ती माझी.........................!

- प्रा. भुषण पाचपोळे