प्रतिक्षा

Started by गणेश म. तायडे, February 02, 2015, 08:26:27 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

प्रतिक्षेत उभा मी,
वाट तुझी पाहतो आहे...
जिवनात एकटा मी,
साथ तुझी मागतो आहे...
ह्रदयात तुझ्या मी,
स्वतःला पाहतो आहे...
नजरेत तुझ्या मी,
स्वतःला शोधतो आहे...
जन्मोजन्मी प्रेम तुझे,
देवास मागतो आहे...
विसरू कसा मी तुला,
तु माझा प्राण आहे...
विसरू कसा मी तुला,
तु माझा श्वास आहे...
ह्रदय माझ्या उरातले,
चरणी तुझ्या अर्पित आहे...
जपशील ह्रदयास माझ्या,
याच प्रतिक्षेत उभा आहे...
तारा बनून आसमानी,
साथी तुझाच राहील...
तुटला जरी तारा,
ईच्छा पुर्ण तुझ्या करून जाईल...

- गणेश म. तायडे
  खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com