अबोल प्रित

Started by गणेश म. तायडे, February 04, 2015, 08:30:28 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

अबोल प्रित तिची,
निशब्द शब्द करूनी गेली...
एकवटल्या चोहीदिशा,
उपदिशा देवूनी गेली...
दुरावा असून पण,
खूप निकट आहोत आम्ही...
अबोला असून पण,
सारे बोलतो आम्ही...
आहे खूप दडलेले,
माझिया मनात...
मिटवूनी दुरावे सारे,
ये जवळ एका क्षणात...
मिटवूनी दुरावे सारे,
ति माझिया जवळ आली...
आयुष्यात माझ्या,
इंद्रधनुरंग भरूनी गेली...
रखरखत्या या उन्हात,
ती सावली बनून आली...
दुःख सारी अलगद,
जिवनातून उडूनी गेली...

- गणेश म. तायडे
  खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com