तुझी ऒढ

Started by deepeshkale, February 05, 2015, 01:21:02 PM

Previous topic - Next topic

deepeshkale

                        तुझी ऒढ

अबोल शब्दांचा गुज टिपत तुझ्या  डोळ्यांत .
झुळुक हळुच पुटपुटून गेली माझ्या कानात .

अल्लड मोरपीस सरकुन हळव्या हातावर . 
मेघ रागात ऒलावले हे स्वर.     

सुकलेल्या ह्या झाडाला, एका पालवीचा हर्ष.
हातात तुझा हात जणु परिसाचा स्पर्श . 

ऒढ किती मी आवरली होऊन दक्ष .
तुझ्या मीठीचाच ह्या वैराग्याला मोक्ष .

श्वासांनी तुझीया उधळले चंदन.
अंतरीची अंतरे कापत तरंगली स्पंदन.

पाण्याला बीलगणारी ही क़िरणे कोवळी .
वाळुवर तुझी पाऊल खुण आभास पावसाळी .

स्वप्न सजलेले तुझे अन् माझे चांदण्यांच्या पालखीत.
तांबुसलेल्या नभाखाली झोकात डुलणारे आमचे गलबत.

उधाणलेल्या समुद्रात पुनवेच्या चंद्राचा पहारा.
एक हास्याची छटा आणि तल्लीन भाबडा किनारा .     

शिंपल्यात मोत्यासाठी, हवी जॊड स्वाती नक्षत्राची .                 
सुख दुःखाच्या प्रवासात, फक्त सोबत हवी तुझी .

तुझ्या रेशमी केसांना झोका देण्यात मग्न हा वेडा वारा .
तुझ्या चाहुलीची वाट बघतोय, माझ्या दाराचा उंबरा.     

स्वलिखीत

दिपेश काळे
(गोवा-०९४०४७५८५७८)