नवं नात

Started by गणेश म. तायडे, February 05, 2015, 05:24:19 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

मि तुला पाहिले
अन् तु मला पाहिले,
मला वाटले कि
तुला प्रेम जाहले...
तु हसून रूसून मजशी
चार दिवस बोलले,
अन् मला वाटले कि
तुला प्रेम जाहले...
तुला मिळवण्यासाठी मी
खूप प्रयत्न केले,
अन् तुला एकेदिवशी
माझ्या मनातले सांगितले...
अग वेडे तुझे प्रेम नव्हते
तर तु हो का म्हटले,
तुझ्या एका होकारात
माझे अख्खे आयुष्य रंगले...
तु निमुटपणे मी दिलेले
नजराणे ही घेतले,
अन् तुझ्यापुढे मी सारे
प्रेम रामायण गायिले...
पण तुझ्या मनातून प्रेमाचे
अडीच शब्द नाही उच्चारले,
जेव्हा तुझिया मनाचे
स्थिर धरण फूटले...
तेथेच त्या क्षणी माझे
रंगलेले विश्व संपले,
अन् तु मला नंतर कधी
चुकूनही नाही भेटले...
तुझे माझ्या मनात
मन नाही गुंतले,
पण वेडे मैत्रीचे तर असावे
घरटे सुरेख गुंफलेले...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com