काय तुला गरज होती ?

Started by श्री. प्रकाश साळवी, February 18, 2015, 08:59:52 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

काय तुला गरज होती ?

काय तुला गरज होती
पुन्हा आयुष्यात येण्याची?
विझलेल्या निखार्‍याला
पुन्हा पुन्हा चेतविण्याची?
पिऊन आसवे मी
शांत पहूडलो होतो
काय तुला गरज होती
एकांती मला भेटण्याची?
काढून टाकिले मी होते
नांव तुझे ह्रदयातून माझ्या
काय तुला गरज होती
माझ्या ह्रदयी थांबण्याची?
बहरली पहाट होती
फूलून चांदण फूलांनी
काय तुला गरज होती
चांदणे फूलवण्याची?
तुझे शब्द माझ्या
ह्रदयात कोरले मी
काय तुला गरज होती
माझे ह्रदय चोरण्याची?
आलीस परतुन माझ्या
जिवनी फिरून प्रितिने
काय तुला गरज होती
मला फिरून भेटण्याची?

श्री. प्रकाश साळवी
18-02-2015.

पुष्पा

आहे अगदी बरोबर -
नव्हती काहीही गरज
त्या सगळ्या गोष्टी तिने करण्याची