तुझे वर्णण

Started by Aniket pawar1, February 19, 2015, 08:01:17 AM

Previous topic - Next topic

Aniket pawar1

वर्णु ग वर्णु किती तुझी वर्णने
तुझ्याच स्वप्नांची मज जाणवे स्पंदने
तुझ्याशी माझे मन हे भिडता मनात झाली कंपने
तोडुन चांगुलपणाची कुंपने कळु लागले स्वातंत्रात राहणे

तुझ्या स्पर्शाने पाण्याचे पण मोती होई
 तुझ्या स्पर्शाने कोमजलेले झाड सुध्दा बहरुन जाई

तुझे हास्य सर्वांना हासवे
त्यातच माझे सौख्य सामवे

माणुसकीची तु ग मुर्ती
तुझ्या गुणांची गाऊ किती किर्ती

माझ्या विरूदध तुझे वागणे
जे मला मोहते ते तु करणे

हे सर्व गुण माझ्या मनास मोहती
तुझ कडे आकर्षित करती

तुला सांगु नये असे वाटते
कारण तु अशीच रहावीस असे वाटते

लिहीताना अश्रु आणि स्वप्ने दाटते
त्यामुळे आता इथेच थांबावे असे वाटते

केतकी

लिहीताना अश्रु आणि स्वप्ने दाटते
त्यामुळे आता इथेच थांबावे असे वाटते

नका थांबू, नका थांबू
वाहू देत अश्रूबिंदू
वर्णत रहा माझी वर्णने
भरू देत पानांमागून पाने