शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, February 21, 2015, 10:20:31 AM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

भर दिवसा  अंगावर घेते
हे रॉकेल ची कॅन दादा
शेजारणीच्या  पोरीपायी
पोरगं झालं जान दादा

उसणवारीला येते जेंव्हा
शेजारणीची काट्टी
अघळ पघळ तेल देते
भरून वाटी वाटी
डब्यासगट पीठ देते
शेजारनिले  दान दादा
शेजारणीच्या पोरीपायी
पोरगं झालं जान दादा

दोरणीवर वाळत राहतात
शेजारणीचे कपडे
त्या कपड्यासोबत तो
करत बसतो लफडे
पांढऱ्या ओढनीवर मार्कर घेऊन
लिहिते आय लव्ह यु जान दादा
खाली कंसात लिहून टाकते
तू मान या ना मान दादा
अन शेजारणीच्या पोरीपायी
पोरगं झालं जान दादा

शेजारनिले पोरिसगट मजुरीने नेते
शेजारनिले धुर्यावर,  पोरीला मधात पाथ देते
अन तिच्याच पाथत पाथ घेऊन
तिला निंदू लागते राण दादा
शेजारणीच्या पोरीपायी
पोरगं झालं जान दादा

कापूस वेचता वेचता याची
जीभ चभर चभर चालते
घडी घडी शेजारणीच्या
ओटीत हात घालते
खरच तुझ्या ओटीतली
म्हणते बोंडे किती छान दादा
शेजारणीच्या पोरीपायी
पोरगं झालं जान दादा

वाट लावली या पोराने
असे करू करू
आता मी सुद्ध्या माझ्या बायकोला
मिठीत लागलो धरू
त्याच्यामुळेच माझ्या म्हातारपणात
आली जवानीची जान दादा
अन शेजारणीच्या पोरीपायी
वावर पिकलं छान दादा


Elobangky

[url="http://seekingalpha.com/user/42476446/profile"]สโบเบท[/url]







NARAYAN MAHALE KHAROLA