स्वप्नी मज तु

Started by धनंजय आवाळे, February 21, 2015, 02:14:40 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

स्वप्नी मज तु अशी भेटते
काहूर मनी का दाटते
चेहरा गुलाबी न्याहाळताना
विझलेली ठिणगी पुन्हा पेटते

हरलेला डाव पुन्हा रंगतो
तुझा गंध श्वासात तरंगतो
तुजपासुन दूर जाऊनही मी
तुजपाशी येउन पुन्हा थांबतो

तुझ्याच साठी हुरहूरतो
तुझ्याच साठी मनी झुरतो
असलो जरी किती कोरडा
तुजसाठीच मी पाझरतो