कावळ्या

Started by धनंजय आवाळे, March 05, 2015, 03:35:24 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

ये रे कावळ्या आता किती वाट पाहू
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहु

काव तुझी एकण्यास टवकारले कान
संपता संपेना ते नेत्यांचे भाषण
काव तुझी गोड  परी भाषण पकाऊ
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहु

रडूनीया व्याकुळ झाले सारे आप्त
तुझ्या काकस्पर्शाने कर आत्मा मुक्त
इच्छा मागे राहिलेल्या पुर्ण करून घेऊ
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहु

तुच  आमचा मुक्तीदाता तारणहार तु
स्वर्गाच्या दारावरी द्वारपाल तु
पोटातही ओरड तुझी कशी आम्ही सहू
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहु

तुझसाठी घास सारा का करी संकोच
करी जीवा मोकळा मारूनीया चोच
संधी ही नामी तु नको वाया घालवू
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहु

खूप केली आता आम्ही तुझी आर्जवे
दर्भाच्या कावळ्याचे शास्त्र आम्हा ठावे
दर्भ करून कावळा आम्ही मुक्त होवू
शीव पिंडास त्वरे खोळंबले बहु

NARAYAN MAHALE KHAROLA