प्रेमात पडण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

Started by swap90, November 21, 2009, 09:38:09 PM

Previous topic - Next topic

swap90


-----------------------------------------------------------------------------------------

कॉलेजला admission घ्यायचं होतं
कुठं चांगलं शिकवतात पहायचं होतं
विचार करून घ्यायचा होता निर्णय
पण ऐनवेली एक मुलगी छान दिसली
आणि तिच्याच कॉलेजात admission घेवून टाकली
कारण, मुलीच्या मागे फिरण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

admission घेताच गंभीर मी झालो
जीव तोडून अभ्यासाला मी लागलो
स्वप्न होतं काहीतरी करून दाखवायचं
पण ऐनवेली mobile माझा वाजला
मैत्रीणीशी बोलण्यात दिवस मी घालवला
कारण, तिच्याशी तासंतास बोलण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

मैत्रिण झाली की त्याची चर्चा होणं सोबतच आलं
मित्रांमद्धे गप्पांचा विषय होणं सोबतच आलं
शेवटी त्यांना दुसरयांच्या गोष्टीत रस हा असतोच
पण आपणही सर्वकाही सरळसोट सांगत नसतोच
काही गोष्टी आपल्यापुरात्याच ठेवणं चांगलं आहे
कारण, काही गोष्टी मित्रांपासून लपवण्यात एक वेगलीच मजा आहे

मैत्रीच्या त्या नात्यात चार बागा फिरलो
ओसंडणाऱ्या गर्दीत हातात हात घेवून तरलो
एकदा movieला जाण्याचा plan ठरला
तिच्या hostleपाशी मी जरा लवकरच पोचलो
वेळ होता तिला यायला म्हणून खालीच उभारलो
कारण, तिच्या hostleखाली वाट पहाण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

रोज रात्री मी तिच्या फोनची वाट पाहतो
तिचा गोड आवाज ऐकण्यासाठी झुरत राहतो
कितीही बोललं तरी मन भरत नसतं
तरी शब्दांविना नातं कधी बोलत असतं
बिछान्यावर पडल्यावरसुद्धा विचारचक्र सुरू असतं
कारण, तिच्या विचारात गुंग होण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

आयुष्यात कॉलेजचे दिवस एकदाच येतात
तेव्हा आकाशातले शुक्रचांदणे जवलीक साधतात
अशा वेळेचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा
लोक म्हणतात की शाहण्या माणसाने प्रेमात पडू नये
पण मी म्हणतो की माणसाने एकदातरी प्रेमात जरूर पडावे
कारण, तिच्या प्रेमात पडण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

- आपला स्वप्निल



nikita

apratim kavita aahe.
kharach  प्रेमात पडण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे :D