जेव्हा तो शांत असतो

Started by janki.das, November 23, 2009, 12:06:00 PM

Previous topic - Next topic

mayuri kadam




rakhi22


जेव्हा तो शांत असतो, त्याच्याकडे बोलण्यासारखे खरच काही नसते...
जेव्हा ती शांत दिसते, तेव्हा मात्र असंख्य विचार तिच्या मनात फेर धरूंनी नाचत असतात.

जेव्हा तो वाद -विवाद करत नाही, तेव्हा तो त्या mood मधे नसतो...
जेव्हा ती वाद -विवाद टाळते, तेव्हा ती सखोल विचार करीत असते.

जेव्हा तो तिच्याकडे प्रश्नाभर्या नजरेने बघतो, तेव्हा तो खरच confuse असतो...
ती त्याच्याकडे प्रश्नाभर्या नजरेने बघते, ते विचारायला "अशीच नेहेमी साथ देशील ना!"

जेव्हा तो काही सेकंदात उत्तर देतो "मी ठीक आहे", तेव्हा तो खरच ठीक असतो...
जेव्हा ती काही सेकंदात उत्तरते "मी ठीक आहे", तेव्हा ती अजिबात ठीक नसते.

जेव्हा तो तिच्याकडे रोखून बघतो, तेव्हा तो रागत असतो नाहीतर आश्चर्यचकित...
ती त्याच्याकडे रोखून बघते, ते नजरेनेच त्याला विचारायला "तू खोटे का बोलत आहेस".

जेव्हा तो तिला रोज call करतो, तो त्याचा talk time खर्च करीत असतो...
जेव्हा ती त्याला रोज call करते, तिला फक़त त्याचे थोडेसे लक्ष हवे असते.

जेव्हा तो तिला रोज sms करतो, ते फक़त forwards असतात...
ती त्याला रोज sms करते, तो एकाला तरी reply करेल या अपेक्षेने.



Maddy_487

हे फक्त एका बाजूने विचार करून लिहिल्यासारखे वाटते आहे.


प्रत्येक ओळीमध्ये फक्त तिच्या गोष्टींवर भर दिलेला आहे.