मला वेडं केलं...

Started by धनराज होवाळ, April 01, 2015, 11:50:44 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

खरंच गं सखे,
तुनी मला वेडं केलं...

मला वेडं केलं..
तुझ्या त्या प्रेमळ हसण्यानं,
तुझ्या त्या मुळूमुळू रडण्यानं..
तुझ्या त्या सुलभ रुसण्यानं,
आणि तुझ्या त्या कधीतरी रागवण्यानं..!!

मला वेडं केलं..
तुझ्या त्या इश्श्श्य.. म्हणण्यानं,
तुझ्या त्या गोड बोलण्यानं..
तुझ्या त्या गाल फुगवून बसण्यानं,
आणि तुझ्या त्या गुपचूप इशाऱ्यानं..!!

मला वेडं केलं..
तुझ्या त्या टपोऱ्या डोळ्यानं,
तुझ्या त्या गालावरच्या बटेनं..
तुझ्या त्या पाकळीसारख्या ओठानं,
आणि तुझ्या त्या गुलाबी झालेल्या गालानं..!!

मला वेडं केलं..
तुझ्या त्या हृदयाच्या स्पंदनानं,
तुझ्या त्या वेडदायक अदेनं..
तुझ्या त्या ठुमकत चालण्यानं,
आणि तुझ्या त्या वाऱ्याशी खेळणाऱ्या केसानं..!!

मला वेडं केलं..
तुझ्या त्या पागल म्हणण्यानं,
तुझ्या त्या लाजुन झुकणाऱ्या नजरेन..
तुझ्या त्या माझीच स्वप्नं पाहणाऱ्या मनानं,
आणि तुझ्या त्या माझ्यासाठी धडधडणाऱ्या हृदयानं..!!

खरंच गं सखे,
तुनी मला वेडं केलं..
आणि या 'धनराज'चं नाव,
"प्रेमवेडा राजकुमार" असं केलं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार