यावे पुन्हा भूमंडळी राजे

Started by sachinikam, April 03, 2015, 12:24:41 PM

Previous topic - Next topic

sachinikam

यावे पुन्हा भूमंडळी राजे


हे हिंदवी स्वराज्य संस्थापिले तुम्ही
शतकोटी नमन आहोत ऋणी आम्ही
समृद्ध संपन्न राष्ट्र महान अपुले
ऐशा पावन भूवरी सौख्य आम्हासि लाभले
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
दीपस्तंभापरी मार्गदर्शाया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।। धृ.॥

कित्येक दशके उलटली आक्रमणे परक्यांची झाली
मतलबी राज्यकर्त्यांनी अस्मिता गंगेस वाहिली
घुसला भ्रष्टाचार अंगी पिळती रयतॆच कान
निर्लज्जापरि दिल्लीमध्ये अजुनी झुकविती मान
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
स्वाभिमान जागृताया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।। १. ॥

जाहले व्यक्तीस्वातंत्र्य स्मशान
पेटले ऐसे लोकशाहीचे रान
बुजलेले ते नेते कसले
श्रेष्ठींच्या आदेशाला जे समजती शान
विकासाच्या आराखड्यात भरती स्वत:चीच तिजोरी
सामान्यांच्या नशिबी मात्र शिळी शिदोरी
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
कडेलोट बुजगावन्याना...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।। २. ॥

म्लेंछांनी माजविला अतिरेक
पडती बळी नि:ष्पाप कित्येक
देखते निमूट हतबल सरकार खेळ
कोण जाणे कुठे चुके गुप्तहेरांचा मेळ
शक्तीपरी युक्ती वापराया
गनिमी कावा आम्हा शिकवाया
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
दुष्ट प्रव्रुत्तींना ठेचाया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।। ३.॥

घुमतोय नाद हर  हर महादेव सह्याद्रीतून
गरजतोय प्रतिसाद जय भवानी अंतरातून
फडकतोय दिमाखात भगवा रायगडावरी
पाहतोय वाट झाला आतुर भेटण्या गड शिवनेरी
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
मराठा तितुका मेळवाया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।। ४. ॥

कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com

sachinikam

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा .

sachinikam

यावे पुन्हा भूमंडळी राजे !

प्रेम कविता



कधी नव्हतं ते,पडलं तुझ्या प्रेमात
शांत मनाचं हरीण,शिरलं गुलाबी वनात
माया तुझ्याविषयी, वाढली माझ्या मनात
थकलं होतं हरीण,फिरून उन्हातान्हात...

बोलावसं वाटायचं,एकदम मणभर
विचारांचं बोचकं,सोडून भराभर
पाहता क्षणी तुझी, नजर माझ्यावर
बोचकं तर सोड,गाठ सुटेना लवकर

सगळ्यामध्ये असताना,तुझं चोरून बघणं
दुपारची झोप टाळून, तुझं वाट पाहणं
मी नसताना आई ला,विचारपूस करणं
माझ्या वेड्या प्रश्नांना,खळी देऊन हसणं

वनातलं हरीण आता,विसावलं तुझ्या प्रेमात
तुझ्या गालावरची खाली आता,रुजली माझ्या मनात
तुझ्या साथीचा पाऊस आता,पडू दे या वसंतात
मनाचं हरीण माझ्या आता,हरवू दे गुलाबी वनात....
महादेव कुंटे कवी