* चारोळ्या बलात्कार च्या *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 04, 2015, 11:52:06 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* बलात्कार *
हो बलात्कार झाला माझ्यावर
कधी मनावर कधी शरीरावर
विश्वास होता मला ज्यांच्यावर
त्यांनीच लुटले मला आयुष्यभर

बाप भाउ काका मिञ
अशी कित्येक होती नाती
ओरबाडुन कुस्कारुन मारुन ठोकुन
पविञ नात्यांची केली माती

मीच जन्माला घातलेना यांना
विसर पडला का त्याचा
मग कसा झाला धीर
यांना मला बदनाम करण्याचा

आहे कुठे कृष्ण सखा
आज द्रौपदीची अब्रु वाचवायला
बघरे कशी कौरवं निघाली
तिच्या सन्मानाची लक्तरे टांगायला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938