पहिले प्रेम

Started by avighanav, April 04, 2015, 10:03:26 PM

Previous topic - Next topic

avighanav

पहिले प्रेम......
माझे पहिले प्रेम...
पहिल्या भेटी मनात एक चित्र उमटले
एक... सुंदर चित्र
निळेभुर डोळ्यांत एक शांतता
हस्यात एक रहस्य ||

माझे पहिले प्रेम...
वाटेवरी घर तिचे
त्या वाटेवरी दिवसरात्रं प्रवास माझे
हा.. प्रवास फक्त एक भेटीसाठी
फक्त ...फक्त एक भेटीसाठी

माझे पहिले प्रेम...
सुट्यांत जणु छंद जोपासला
मित्रांच्या अशांत क्षणांत
प्रेम भेटीचा तो विसाव्याचा एक क्षण

माझे पहिले प्रेम...
एकी रात्र त्या वाटेवरी प्रवास
थक्क......
दार बंद... घराला टाळा....
तो चेहरा दूर गेला होता
खुप खुप दुर......
आजही मन वाट पाहते त्या चेहर्याची
माझे पहिले प्रेम...
माझे पहिले प्रेम... अर्धवट आहे..अर्धव
स्वलिखित - रोशन कदम(अविघ्नव)..