करावे त्याने प्रेम असे .....

Started by neha.hatekar, April 05, 2015, 01:33:27 AM

Previous topic - Next topic

neha.hatekar

करावे त्याने प्रेम असे .....

करावे त्याने प्रेम असे
माझ्या काळजाचे बनावे त्याने स्पंदन जसे

प्रेम करावे त्याने माझ्या सुरांवर
ओठांवर रुळणाऱ्या माझ्या शब्दांवर
त्याच्या मनी असलेल्या माझ्या प्रतिबिंबावर
आठवणीच्या डोहातील पाण्याच्या प्रत्येक थेंबावर

करावे त्याने प्रेम माझ्या रागावर
माझ्या स्मित हास्यावर
मी  गायिलेल्या प्रत्येक स्वरावर
मी सांगितलेल्या आकांक्षकेवर

चाहूल जाणवावी त्याला माझ्या येण्याची
वाट असावी त्याला माझ्या भेटीची
जो देईल  मला साथ आनंदात आणि दुःखात
मी करणार नाही त्याचा कधीच विश्वासघात

जेव्हा तो भेटेल मला
नजरेत साठवून घेईल त्याला
प्रत्येक इच्छा पूर्ण करेल त्याची
पाहील त्याला पापणी न लवता डोळ्याची

करेल त्याच्यावर प्रेम खरे
इतके की आयुष्य वाटेल अपुरे
आहे मला त्या क्षणाची वाट
आनंदाचा मेळ घेऊन येईल सोनेरी लाट...

-नेहा  हातेकर         

Radha Phulwade

kharach ......करावे त्याने प्रेम असे  :) :)

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]