प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...

Started by anolakhi, November 26, 2009, 08:21:11 PM

Previous topic - Next topic



asmitakeer@gmail.com


प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...
[/b]

प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई....हि कविता लिहिल्या नंतर काहीतरी चूक-चुकल्या सारखे वाटत होते,खरतर मी वरचे-वर ह्या एका नाजूक विषयाला स्पर्षले पण राहून-राहून वाटत होते कि ह्या सर्वात त्या मुलाच्या वडिलाना मी जाणीवपूर्वक विसरत आहे.
खरतर आपल्या मुलाकडून आई आणखीन त्याचे बाबा दोघांच्याही काही अपेक्षा असतात.मुलगाही मोठा होत असताना ह्या अपेक्षा पूर्ण करतो,पण त्याच्या वाढणार्या वयासोबत तो प्रेमाची एक व्याख्या बरोबर घेऊनच मोठा होतो.बर्याचदा हि निर्मल प्रेमाची व्याख्या तो आपल्या आई वडिलांच्या असलेल्या प्रेमाच्या नात्यातूनच शिकत असतो.
    त्यामुळे मला सतत वाटत होते कि जर ह्या मुलाला होणारे अनुभव त्याने शिकलेल्या प्रेमाच्या व्याख्ये पेक्शाजार वेगळी असेल तर,नकळत हा मुलगा आपल्या आई-वडिलांपासून दुरावत जातो.त्याच्यात होणाऱ्या बदलावाना त्याची आई फार जवळून अनुभवत असते.
पण ह्याच आपल्या तरुण मुलाची मनःस्थिती त्याच्या वडिलां पासून काही काल लपून रहाते.कारण वडिलाना आपल्या घरासाठीची जबाबदारी घराबाहेर राहून पार करायची असते.
ह्या सर्वात वडिलाना आपल्या मुलाचे मोठेहोने थोडे उशिराच  जाणवते.आणि जेव्हा त्याना आपल्या मुलाच्या तुटलेल्या प्रेमाच्या स्वप्नाबद्दल कळते तेव्हा ते धड त्याच्याशी मोकळेपणे संवादही साधू शकत नाही.
हि सर्व मुलाच्या  मनाची घालमेल वडील थोडे आशायाच्याबाहेर राहूनच हाताळत असतात.
हि वडिलांची धडपड फक्त त्यांनाच माहित असते.
आणि त्यामुळेच मी अनेक प्रयत्न करुणाही ह्या कवितेत वडिलांची बाजू मांडू शकलो नव्हतो.
आणि कालच (११/०१/२०१०)  t .v . वर सौमित्रांच्या तोंडून ऐकलेली ओळ हे सर्व एकदम सहजपणे स्पष्ट करते.
               वडील म्हणजे express न करता आलेली एक आईच...
                                                                                                       सौमित्र.. ..
आणि हे एकाताच बऱयाच दिवस अडकेलेले काहीतरी मनातून मोकळे झाले


पहाटे  मी जाताना गाढ झोपेत असतोस,
आणि संध्याकाळी नेमकी माझी परतीची वेळ साधून घर सोडतोस...
कोठे जातोस तिन्हीसांजेला रोज,
मलाही सांग  ,म्हणजे तिथे कधीतरी आपण दोघेमिळून जाऊ,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

आठवते तुला लहान होतास तेव्हा,
मी परतल्यावर,माझ्या हातून खाउची पिशवी हिसकावून घ्यायचास,
तेव्हा भले तुझ्यावर रागे भरायचो मी,
पण मला मात्र  तू नेहमीच तसाच हवा-हवासा वाटायाचास
सांग आता काय आणू मणजे ,बाळा तू परत धावत माझ्या मिठीत येशील,
तुला हवे ते शक्या असेल तर देऊ,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

काल तुला आईच्या कुशीत डोके ठेऊन रडताना पहिले,
कसे सांगू त्या क्षणी मी का-काय हरले,
अरे तुझ्या वयातून मी हि गेलोयाच कि कधीतरी,
कधीतरी,बघ माझ्याकडेही मन मोकळे करून,
मग मी हि साथ देईन तुला,
बघेन मीही घटका-दोन घटकाभर रडून...
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

एखादा रविवार साधून तुला गाठेन म्हणतो,
तर तू शनिवारीच रात्री मित्रांसोबत बाहेर निघून जातो,
मग वाटते,चला बरेच झाले,
तुझे मन तिथेतरी कदाचित जाईल रमून,
पण कधीतरी मला भीतीही वाटते बरका !
कधी उचलू नकोस चुकुनही वाईट पाउल,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

अभ्यासासाठीही कधीच पहाटे जागा न होणारा तू,
हल्ली कधीतरी भल्या पहाटे जागा दिसतोस,
हळूच डोकावून पाहिले,तर डायरीत काहीतरी लिहिताना दिसतोस,
काल मी चोरून तुझी डायरी वाचलीच,
त्यात लिहिलेल्या कविता वाचून न रहावून डोळे ओलावालेही,
वाटले बोलावे,"छान लिहितोस,इंगीनीरिंगच्या  अभ्यासासोबत,ह्याकडेही लक्ष दे,
कवी हो आणि झालाच तर ह्यालाच पुढे करिअर म्हणून निवड",
पण नको,कवी हो सांगेन पण कसे सांगू,कि कवितेसाठी "विरह" विषय निवड,

पण एव्हढे  मात्र आता नक्की सांगतो,
बोलू आपण ह्याही विषयावरही पुढे जाऊन,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...



आणि अश्या प्रकारे वडील हा विषय टाळून जातात,पण मुलाच्या मनातील तळमळ त्यांच्या मनालाही एक कळ-कळ देऊन जाते

                                                                                                                                                                                                अनोळखी ..












प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....
मित्रानो,प्रेमात जेव्हा विरह येतो तेव्हा तुटलेल्या मनाला आधार लागतो आणि तेव्हा आपणास खरा आधार मिळतो तो आपल्या जन्मदाती जननिचा, 
पण आईलाही आपल्या लेकराचे दुःख बघवत नसते....
अश्याच एका विरहात दुखी मुलाच्या आणि आईच्या मनाची स्थिति मी येथे मांडन्याचा  प्रयत्न करत आहे...
खरे तर आई आपले मन बरोबर ओळखते, पण आईचे मन ओळखने तसे अवघडच आहे...


   आई...               


आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?                  
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,                  
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?                  

ठाउक आहे मला,                  
आई तू बोलायचिस,                  
बाळा तू फसत आहेस,                     
आतल्या आत का धसत आहेस?                  

ठाउक आहे मला,                  
मी तुझ्या बोलन्या कड़े काना डोळा करायचो,
तिच्या प्रेमात अजुनच बूडत जायचो,
परतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद करत जायचो...

आई,तरी आज तू मला समजुन घे,
माझ्या केसात हात तुझा फिरवत,
माझा चेहरा वाचून घे,
डोळ्या कड़े मात्र बघू नकोस,
आसवान आड़ तिला डोळ्यातच  राहून दे...

आई,तू प्रश्नांची घाई करू नकोस,
मी हळू-हळू माझे मन मोकळे करेन तुझ्या कड़े,
आहे जे काही साठलेले मनात सर्व वाहीन तुझ्यापुढे,
मी सर्व सांगत  असताना मात्र तू धीर सोडू नकोस...

मी तिच्या बद्दल जे काही सांगेन
ते तू खुल्या मनाने ऐक,
तुला वाटेल मी तिची बाजू मांडत आहे,
पण तू माझी बाजू  बघून अश्रु ढाळू नकोस,

आई मी कदाचित माझा धीर सोडेन,
रडून-रडून तुझे पदर ओले करेन,
तरी तू तिच्यावर रागावू नकोस,
आता पुरे म्हणून मला रडायचे थाम्बवु नकोस,

तुझे ऐकत नाही म्हणून कदाचित तू मला तुझ्या पासून दूर लोटशील,
तू किव्हा मी ठरव असे देखिल म्हणशील,
पण आई असे विचारून तू तुझ्या लेकराची परीक्षा घेऊ नकोस,
विसरत नाही तिला म्हणून मला कायमचे दूर करू नकोस...

माहीत आहे तिने तुझ्या लेकराचे मन तोडले,
तुझ्या लेकराचे स्वप्न पूर्ण होण्या आधीच मोडले,
आई...तरी ज़रा सबुरिने घे,
मला तेव्हा हवे असलेला तुझा आधार दे...

तेव्हा सावरल्यावर मी कदाचित परत मी तिच्या कड़े जाइन ,
थोड्या दिवसाने परत माझे तुटलेले मन घेउन तुझ्या कड़े येइन,
तेव्हाही मी तुला हाच प्रश्न करेन,
आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?



      मुला...

   मुला ,कसे सांगू मी तुला,   
   तुझे हे मुके दुःख नाही बघवत मला...   

   असे वाटते तुला जवळ घ्यावे,   
   कुशीत तुझे डोके घेउन ,   
   केसांना हळूवार कुरवाळावे,   
   मग हात मागे घेते,कारण समोर असून देखिल,
   तू भासतो कोणात तरी हरवलेला,
   मुला ,कसे सांगू मी तुला,
   
   तुला ठाउक नसेल,असेल ही कदाचित,
   मला तुझे दुःख कळते ते...
   अरे आजवर तूच म्हणायचासना,
   आई तुला माझे डोळे कसे कळतात? 
   मग आज असे डोळ्यात आसव लपवत आई पासून का दुरावला ?
   मुला ,कसे सांगू मी तुला,

   खर्‍या प्रेमाची व्याख्या मीच तुला सांगितलेली,
   आता प्रश्न पडतो तुला ती का नीट समजलेली?
   राहून गेलेले जे सांगायचे ते आता सांगते ,
   ऐक,मुला खर्‍या  प्रेमामध्ये हार-जित नसते रे,
   पण मीही तर पाहू शकत नाही तुला हरलेला...
   मुला ,कसे सांगू मी तुला,

   काल रात्री तू परत तू उशिरा घरी आलास,
   माझे मिटलेले डोळे पाहून पुन्हा उपाशी पोटी झोपी गेला,
   मला वाटले विचारावे काय झाले?
   मी उठलिही बिछान्यातुन,पण,
   तुला रडताना पाहून,माझाही तोल गेला,
   वाटले तुझी समजूत काढावी,हाताचा  बनवून झूला...
   मुला ,कसे सांगू मी तुला,

   आज मी तुझ्या प्रेमाला कोणा दुसऱ्या सोबत पाहिले,
   रागात असे वाटले तिला जाब विचारावा,
   प्रेम नाही तुझे जर माझ्या मुलावर तर,
   त्याला जवळ का करते"?
   सोबत नको आयुष्याची तर एकदाच दूर का नाही लोटते?
   पण मी तिथेच थबकले,कारण मी पाहिले तिथेच कोपऱ्यात तुला,
   मुला ,कसे सांगू मी तुला,

   मुला,आता तुझे ओलावालेले डोळे पाहून,
    माझे पदरही भिजलेरे..
   तुला नेहमी जिंकताना पाहणारे,माझे डोळे ,
   तुला हरलेला पाहून पुरते खचले रे,
   माहीत आहे शक्य नाही,
   म्हणुनच सांगत नाही,विसर आता तिला....
   मुला ,कसे सांगू मी तुला,
   तुझे हे मुके दुःख नाही बघवत मला...

kishor.sawangikar

आज मी तुझ्या प्रेमाला कोणा दुसऱ्या सोबत पाहिले,
   रागात असे वाटले तिला जाब विचारावा,
   प्रेम नाही तुझे जर माझ्या मुलावर तर,
   त्याला जवळ का करते"?
   सोबत नको आयुष्याची तर एकदाच दूर का नाही लोटते?
   पण मी तिथेच थबकले,कारण मी पाहिले तिथेच कोपऱ्यात तुला,
   मुला ,कसे सांगू मी तुला,

Nice ONE.....



sheetal.pawar29

आज मी तुझ्या प्रेमाला कोणा दुसऱ्या सोबत पाहिले,
   रागात असे वाटले तिला जाब विचारावा,
   प्रेम नाही तुझे जर माझ्या मुलावर तर,
   त्याला जवळ का करते"?
   सोबत नको आयुष्याची तर एकदाच दूर का नाही लोटते?
   पण मी तिथेच थबकले,कारण मी पाहिले तिथेच कोपऱ्यात तुला,
   मुला ,कसे सांगू मी तुला,


mazya kade tar shabdch nahit re kahi sangayla...
as watal ki kadhich konavar prem karu naye...
mhanatat na .... jyach jalat tyalach te kalat....

sheetal.pawar29

आज मी तुझ्या प्रेमाला कोणा दुसऱ्या सोबत पाहिले,
   रागात असे वाटले तिला जाब विचारावा,
   प्रेम नाही तुझे जर माझ्या मुलावर तर,
   त्याला जवळ का करते"?
   सोबत नको आयुष्याची तर एकदाच दूर का नाही लोटते?
   पण मी तिथेच थबकले,कारण मी पाहिले तिथेच कोपऱ्यात तुला,
   मुला ,कसे सांगू मी तुला,


majya kade tar shabdach nahit bolayla....
mhanatat na...jyach jalat te tyalach kalat...