सुखामागे धावता धावता

Started by Rajesh khakre, April 10, 2015, 10:09:53 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

सुखामागे धावता धावता पाय दमून गेले
सुख काय आहे ते नाही कळून आले

पैशात सुख मिळेल म्हणून पैसे कमवून पाहिले
लाखो करोडो जमवले पण कमीच वाटत राहिले
पैशाने वस्तु जमवल्या पण समाधान निघुन गेले

घर-दार गाड़ी-बंगला सारं काही घेतले
चार भिंती,चार चाकात सुख कुठे मावले
स्वप्न आणि वास्तवाचे गणित नाही जुळले


प्रतिष्ठा मिळेल म्हणून निवडणूक लढवली
खुर्ची मिळण्यासाठी शक्ति पणाला लावली
पदासोबत मिळेल सुख मनसूबे फोल ठरले

मान मिळावा मोठा म्हणून लोक भोवती जमवले
फायदा करुन स्वतःचा सर्व निघून गेले
स्वार्थी लोक होते सगळे आले तसे गेले


झुळ -झुळणाऱ्या झऱ्याजवळ नाही क्षणभर बसलो
कोसळणाऱ्या पावसात कधी नाही चिंब भिजलो
आकाशातील चांदणे कधीच नाही न्याहाळले

बालकाचे हास्य नाही मनापासून पाहिले
बोबड्या बोलाचे त्याच्या कौतुक नाही केले
मोठा होण्यासाठी बालपण हरून गेले

संगीताचे सुर हल्ली ऐकल्याचे आठवत नाही
चुलीवरची चटणी-भाकर आता स्मरत नाही
मित्रांसंगे कट्ट्यांवरती आता बसणे बंद झाले

फेसबुक अन् वॉट्सऍप वरतीच वेळ निघून जातो
अनोळखी लोकांसोबत तासंतास्  chating करतो
फोन आल्यापासून नातलगांना भेटणे राहून गेले

सुखाच्या शोधात रात्रंदिन असाच हिंडत असतो
पायाखाली तुडवून सुखे जगभर भटकत असतो
जगण्यासाठी जगताना जगणे विसरून गेलो
 
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com