तू विसरु शकणार नाही

Started by chetan (टाकाऊ), November 28, 2009, 12:50:32 AM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)




तू विसरु शकणार नाही

नदीचा काठ चमचमत पात्र ,
उतरता घाट मोहरती गात्र .

तू विसरु शकणार नाही

कलंडता सूर्य लवंगति सांज
पक्षांच्या माला कुमकुमती झांज

तू विसरु शकणार नाही

सोनेरी उन वार्याची धुन ,
पावलांची चाहुल ओलखिची खून .

तू विसरु शकणार नाही

दिलेला शब्द ओझरता स्पर्श ,
दड्लेल प्रेम ओसरता हर्ष .

तू विसरु शकणार नाही

हातात हात आणि तुझ माझ हितगुज ,
आंब्याच्या झाडावर चिमन्याची कुजबुज .

तू विसरु शकणार नाही

भिजलेले डोळे विरलेले स्वप्न
भिजलेली वाट उरलेले प्रश्न

तू विसरु शकणार नाही आणि मी ही विसरु शकणार नाही

Shyam

भिजलेले डोळे विरलेले स्वप्न
भिजलेली वाट उरलेले प्रश्न

तू विसरु शकणार नाही आणि मी ही विसरु शकणार नाही 

Mastach ....

Parmita

दिलेला शब्द ओझरता स्पर्श ,
दड्लेल प्रेम ओसरता हर्ष
भिजलेले डोळे विरलेले स्वप्न
भिजलेली वाट उरलेले प्रश्न

तू विसरु शकणार नाही आणि मी ही विसरु शकणार नाही !!! Chaan....


manoj joshi

या कवितेचे मुळ कवी- प्रसाद कुलकर्णी...