* महाराष्ट्र *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 01, 2015, 03:14:33 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* महाराष्ट्र *
आजही बोलतो सांगतो
सह्याद्रीचा काना कोपरा
छञपतींच्या तलवारीने लिहीला
महाराष्ट्राचा इतिहास सारा

मराठी मातीतुन उगवला
एक तेजस्वी सुर्यतारा
गोरगरीब लाचार रयतेला
त्यांनी दिला आसरा

आले गेले कित्येक
जिंकण्या महाराष्ट्र आपला
मर्द मराठ्या मावळ्यांनी
त्याला या जमिनीतच गाडला

स्वराज्याची तोरण बांधुन
शिवरायांनी महाराष्ट्र बांधिला
त्यांच्या पराक्रमांनी दिल्लीश्वरही
आपल्या आसनावरच थरथरला

शेवटी शिवरायांच्या पुढे
तोही नामोहरण झाला
असा शिवछञपती राजा
माझ्या महाराष्ट्राला लाभला


म्हणुन झकुनी करतो
शिवरायांना मानाचा मुजरा
चला राजांच्या आठवणींनी
करुया महाराष्ट्र दिन साजरा.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938