कवी पावसाळी

Started by धनंजय आवाळे, May 20, 2015, 10:05:45 AM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

मी कवी पावसाळी
थेंबात शब्द पाहतो
डोक्यातल्या ढगातून
कवितेचा पूर वाहतो

चमकून जाते मनात
कल्पनेची वीज
जन्म घेते उरात
कवितेचे बीज

एका सुरात जसा
ढगातून पाऊस गळतो
कवितेमध्ये तसाच
शब्दाला शब्द जुळतो

कुणी वाचो अगर ना वाचो
मी जाणारच लिहीत
कवितेचा पाऊस
पडतो माझ्या वहीत

माझ्या कवितेच्या पावसाचा
असतो टपोरा थेंब
घ्या रेनकोट किंवा छत्री
होणार तुम्ही चिंब


kundlik mhetre

kavi Manatil pavsali kavita chyan aahe...nice sir