पाऊस...

Started by महेश रा. केसरकर, May 20, 2015, 02:28:58 PM

Previous topic - Next topic

महेश रा. केसरकर

आज तीची आठवण आली
बरसनार्या सरींना पाहून
बरसली होती अशीच एकदा
मला घट्ट मिठीत घेऊन

त्या आठवांचा पाऊस
आज माझ्यावरती बरसत आहे
चिंब भिजवलं सरींनी तरीही
मन माञ सुनं आहे

वाटलं  उठावं
आणि तिला भेटावं
मिठी तिला घट्ट मारुन
सार्या जगाला विसरून जावं

कडाडणारी विज ऐकून
भानावर मी आलो
ती आता या जगात नाही
हकीकत मी विसरलो

बरसनार्या पावसाने
आता विसावा घेतला होता
सुन्या मनात माञ माझ्या तो
आता बरसू लागला होता...

-महेश रा. केसरकर(me :P)

शितल