काय सांगू पोरा जेव्हा जन्म झाला तोहा

Started by Rajesh khakre, May 26, 2015, 06:03:43 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

काय सांगू पोरा जेव्हा जन्म झाला तोहा
झाला होता आनंद,पोटात मावत नव्हता मह्या !!धृ !!

झालं होतं पुरं कितिक दिवसाचं सपानं
खुशीमधि तेव्हा वाटली गावात साखर-पानं
संसाराच्या वेलीवर फुललं होतं फुल मह्या

तुला बघत - बघत जगत आलो दिनरात
आम्ही दोघ्ं तुझ्यासाठी खस्ता होतो खातं
पर्वा नव्हती दारिद्रयाची सुखापुढे तुह्या

शिकून सवरुन पोरा तुला मोठं आम्ही केलं
आलं जरी वादळ कितिदा छातीवर झेललं
आईच्या साडीला ठिगळ होती बनियनला मह्या

तुला मोठं करण्यात पोरा यौवन निघून गेलं
हौसमौज नटणं थटणं सगळच राहून गेलं
म्हणायचो जगू आनंदाने राज्यात पोरा तुह्या

संसाराच गाडं थोडं सोईला जेव्हा आलं
वय झालं म्हणून पोरा लगीन तोहं केलं
आल्या सुनबाई घरी,घर सुखानं भराया

लग्नानंतर पोरा तोहया एक वर्ष निघून गेलं
वेगळं निघासाठी सुनबाईनं भांडण केलं
एका हृदयाचे दोन भाग झाले तेव्हा मह्या

पोरा तुह्या चुलीशेजारीच आहे माझी चूलं
झालो असा वांझोटा जसा नाही मूलंबाळं
प्रेमाची ती आमच्या पोरा तुला राहिली नाही सया

लोक म्हणतात "जगाची रीत", मला पटत नाही
असं उपेक्षित जिणं पोरा मला रेटत नाही
तुझ्याच आईच्या मांडीवरती श्वास थांबेल महा
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(माझ्या कविता इमेज स्वरुपात मिळवण्यासाठी whatsapp वर विनंती पाठवा)