एक मीच नाही …

Started by शितल, May 27, 2015, 11:23:26 AM

Previous topic - Next topic

शितल

फाटक्या पदरात माझ्या
खोटी नाणी देखील नाहीत
इथे सर्वच गरीब आहेत
एक मीच नाही ...

डोक्यावरी तो डोंगर
त्या वाढत्या कर्जाचा
पैसा असून उपाशी
हे पोट भरत नाही
इथे सर्वच गरीब आहेत
एक मीच नाही ...

दया न येती कोणा
कितीही गेलो कामा
पैशांचे ते भुकेले
मज हाव त्याची नाही
इथे सर्वच गरीब आहेत
एक मीच नाही ...

घालून तेच वस्त्र
कधी ना झालो त्रस्त
ती ठिगाळलेली चप्पल
थकून बसली नाही
इथे सर्वच गरीब आहेत
एक मीच नाही ...
एक मीच नाही ...

शितल ......  :-X :-\