खरचं असं व्हायचं...

Started by Archana...!, May 27, 2015, 11:36:55 AM

Previous topic - Next topic

Archana...!

खरचं असं व्हायचं...
नजर तुझी चुकवून हळूच तुला पाहायचं...
मन कस अगदी बेभान होऊन जायचं...
अजब होते सारे...पण खरचं असं व्हायचं...

शब्दांविना मला मन तुझं कळायचं....
उगाच मग मी ही मनातल्या मनात लाजायचं...
वेडीचं होते मी...पण खरचं हं असचं व्हायचं...

नकळत होणारा स्पर्श तुझा, मन शहारून जायचं...
कसा रे तू... तुला हे कधीच नाही कळायचं...
मी तरी काय करणार...पण खरचं असं व्हायचं...

तू समोर नसल्यावर तुलाच शोधत बसायचं....
अन् तुला पाहताच उगाच नजर चोरायचं...
खोटेचं सारे बहाणे...पण खरचं असं व्हायचं...

एकांती जेव्हा कधी आभाळ मनी दाटायचं...
साथ मला मिळावी म्हणून ढगांनीही रडायचं...
भासच ते सारे... पण खरचं असं व्हायचं...

कधी असे कारण तर कधी विनाकारण, उगाच रूसायचं...
तुझं मला मनवणं जरा जास्तचं आवडायचं....
प्रेमाने जवळ घेणं...पण तेव्हाचं तर घडायचं...

सगळचं किती गोड, किती हलहवसं वाटायचं...

पण खरचं...असचं अगदी नकळतं सारं घडायचं....


Archana...!

शितल

great.......
majhyasobat hi asach kahi ghdaych...... :-X