पदर...

Started by महेश रा. केसरकर, May 27, 2015, 02:16:36 PM

Previous topic - Next topic

महेश रा. केसरकर

माझ्या निरोपाचं येणं
तुझ्या मनाला लागलं
साता जन्माचं नातं
तुझ्या डोळ्यांत दिसलं

नको हिरमुसली होऊ
ऐक सांगतो सजनी
मी नसता संगतीला
ऐक पाखरांची गाणी

तुझ्या शेताच्या बांधाला
डाव रंगतो पाखरांचा
त्यांच्या संगतीतं तुही
शीन घालवं दिवसाचा

दिवे लागनीची वेळ
सखे आवरं आवरं
घरी वाटं पाहतो एक
डोई पदरं सावरं

-S.K.