मेघश्यामल रिमझिमले

Started by sachinikam, June 02, 2015, 11:51:55 AM

Previous topic - Next topic

sachinikam

मेघश्यामल रिमझिमले

वाढला उष्मा ग्रीष्माचा, सरला मास ज्येष्ठाचा
ऊन मध्यान्हाचे, माथ्यावर शिरवळले
पाऊल चार, नकळत तिकडे वळले

मोकळ्या नभात घन अचानक गजबजले
श्यामल मेघांना वारे गार कुजबुजले


पहिली वहिली सर, धरणीवर बरसली
नि:श्वास तृप्तीचा घेऊन, मृदगंधित झुळूक दरवळली
आसुसलेली झाडे वेली, पानेफुलेही चिंब न्हाली


माथ्यावरचे रान भिजले, शिवार सारे झाले ओले
भिजलेले दोन पक्षी, एका फांदीवर विसावले
पंखावरची ओली नक्षी, एकमेकां पाहून सुखावले


पहिल्या सरीचे पहिलेच थेंब, गालावर तिच्या ओथंबले
बनुनी मोती काही त्यातले, स्पर्शाने तिच्या ओघळले
वाटले टिपावे सगळे, प्राशावे अमृत सगळे


पाहुनी अंग भिजलेले, मन माझे मोहुनी गेले
मोकळ्या केसांना अलगद, हळुवार तिने झटकले
मिटुनी डोळे घेउनि श्वास, रोमरोमांनी माझ्या प्यायले


लाजलेल्या नजरेने, हळूच तिने मज पाहिले
गुपित सगळे मनातले, सहज मला उमगले


श्यामल चंचल मेघ फिरुनी पुन्हा रिमझिमले
दाट घनांच्या गर्दीतून रविराजे डोकावले
साक्ष प्रीतीची द्यावया इंद्रधनु प्रगटले .


कवी : सचिन निकम
कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com

sachinikam

श्यामल चंचल मेघ फिरुनी पुन्हा रिमझिमले
दाट घनांच्या गर्दीतून रविराजे डोकावले
साक्ष प्रीतीची द्यावया इंद्रधनु प्रगटले .

मिलिंद कुंभारे


sachinikam

भिजलेले दोन पक्षी, एका फांदीवर विसावले
पंखावरची ओली नक्षी, एकमेकां पाहून सुखावले

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


sachinikam

मेघश्यामल रिमझिमले