मिठीत मला थोडं घेशील का ?

Started by शितल, June 04, 2015, 06:26:50 PM

Previous topic - Next topic

शितल

सोसल्या ज्या विरहाच्या यातना,
तू ही थोड्या अनुभवशील का ?
मलम लावण्या त्या जखमांना,
मिठीत मला थोडं घेशील का ?

भिजलेले किती रात्र-दिवस ते
तू ही आठवणींत थोडं रडशील का ?
पुसून आसवे माझ्या डोळ्यांतील
मिठीत मला थोडं घेशील का ?

आठवणींतले सुंदर क्षण ते,
तू ही थोडं त्यात रमशील का ?
देऊन कबुली प्रेमाची स्वताच्या
मिठीत तुझ्या अलगद घेशील का ?
:( :( :(

शितल ......

Hreeteish


शितल