वर्गात आलेली ती....

Started by sameer2386, June 19, 2015, 07:47:03 PM

Previous topic - Next topic

sameer2386

आठवतो तो दिवस..
आठवतो तो पाउस..
आठवतो तो मातीचा सुगंध..
त्या निळ्याशार आभाळाने केलेला काळोख,
मधूनच वाहणारी ती वाऱ्याची झुळूक,
काय विलक्षणीय होतं तो क्षण....

आणि अश्याच एका दिवशी,
वर्गात आलेली ती, जणू सोन परीच..
तिचे ते सोनेरी केस, ते स्मितहास्य,
जणू काही परलोकाची अप्सराच..

त्यानंतर ची एक कहाणी काही अजब च होती..

पावसाळ्याचे ते दिवस होते, आम्ही मित्र शाळेत जाण्यसाठी निघालो होतो,
त्या दिवशी पावसाने खूप जोर धरला होता..
जणू काही त्सुनामी च येणार होती असा भासत होतं..
घरातून निघताना च आई म्हणत होती कि बल आज शाळेत नको जाऊस..
तरी ही निघालो होतो शाळेला, का? तर ती पण येणार होतीच ना...
मग काय..या खड्यातून त्या खड्ड्यात आणि त्या खड्ड्यातून या खड्ड्यात..
वेडे वाकडे कसाही उडया मारत एकता का शाळेत पोहोचलो...

वर्गात एन्ट्री करणार..तेवढ्यात मित्राने हाक मारली..
तिने लगेच मागे पहिल..थोडीशी हसली आणि तेवढ्यात सर आले..
सगळे जन पुस्तक शोधू लागले .. मला वाटत मराठी चा तास होता तो ...
माझा आवडता विषय...सरांनी का कुणाच ठावूक नेमक मलाच बोलावलं ..
कदम, इकडे ये..हा परीश्चेद वाच..आणि स्पष्टीकरण दे...
तेवढ्यात मुख्याध्यापक सर आले..आणि सरना घेऊन गेले...
मी सुटकेचा निश्वास सोडला..वाचण्या इतपत ठीक होतं..पण स्पष्टीकरण..!..

दहा ते पंधरा मिनिटे होती सर परत यायला ..
तो पर्यंत माझे मित्र खूप दंगा मस्ती करत होते...
मी स्वाध्याय पूर्ण करत होतो..का? तर घरी खेळायला मोकळा..
लिहिता लिहिता अचानक विचार आला..कि मी का खेळू नये ?
मित्रांबरोबर खेळायला जाणार तेवढ्यात आमचे सर परत आले..
मुलानो, परीक्षेची तयारी करायची आहे म्हणून आज मी क्लास घेणार नाही...
तुम्ही तुमचा तुमचा अभ्यास करा..
कसला अभ्यास, फक्त दहा मिनिटे शिल्लक होती आमच्याकडे..
लगेच निघून गेली ती दहा मिनिटे..

नंतर ची वेळ ही मधली सुट्टीची होती..
खूप आतुरतेने वाट पाहायचो मी मधली सुट्टीची..
का ? तर तिच्या जवळ जाऊन काही तरी बोलेन, गप्पा गोष्टी वगैरे...
पण तो योग कधी आलाच न्हवता...
तो योग आता येणार म्हणून मी खूप खुश होतो..
मधली सुट्टी झाली..सगळे जन हाथ धुण्यासाठी बाहेर गेले...
तेवढ्यात मी तिला पटकन हाक मारली.. आज डब्याला काय आणलं आहेस?
किती दरिंग केली होती माहित आहे का मी हे विचारण्याची..
तिकडून उत्तर आलं..toast bread butter ...
ऐकून बरहि वाटलं आणि तोंडाला पाणी ही सुटलं..
का? तर मी डब्यात शेपूची भाजी आणि चपाती आणली होती..असो..!

मधली  सुट्टी  कधी  दाबा  खाण्यात  संपली  ते  कळलंच  नाह i...
लगेच  घनता  वाजली  आणि  सगळे  वर्गात  आले ...
मित्र  मला  विचारात  होते   कि  तू  का  नाही  आलास  बाहेर?..
मी पोट दुखण्याच कारण सांगितलं आणि टाळला तो विषय..
नाहीतर माझी काही खैर न्हवती.. :)
क्लास सुरु झाला..प्रत्येक जा बी शिकवीत आहेत म्हणून ऐकत होते ..
इथे कुणाला इंटरेस्ट होतं ऐकण्यात ...
कधी बाई खुर्चीवर बसतात त्याची वाट बघत होतो मी ..
एकदा का बाई खुर्चीवर बसल्या ...
नेहमीप्रमाणे लगेच मुलांचा गोंधळ सुरु झाला..ए ए एए ए ए ..
बाईंच लक्ष न्हवत कि बाई जाणून बुजून लक्ष देत न्हाव्त्या ते त्यांनाच त्याचं माहित..

मी आपला गप्पपणे डोळे चुकवून  चुकवून तिच्याकडे बघत होतो....
एका मित्राचं लक्ष गेलं माझ्याकडे...कदम...hmm ..काय चालू आहे हा..!
झोप आली आहे वाटत तुला .. कि डोळे दुखत आहेत...हा हा ..!
माहित होतं त्याला..पण तरीही माझी टिंगल करत होता...
असतातच मित्र असे .. सगळ्यांचे तसे माझे ही ..
वेळ कधी निघून जायची ते त्या दिवशी मला काळात च न्हवत..
वन्दे मातरम सुरु झाले ..सगळे गप्प होते...
त्या स्लोगन ला एवढी किंमत असते ही तेव्हा कळत न्हवत..
तरीही मान वंदना द्यायचो आम्ही..


                     -- समीर प्रकाश कदम