म्हातारीचा वाडा

Started by dhundravi, December 09, 2009, 09:17:40 AM

Previous topic - Next topic

dhundravi

म्हातारीचा वाडा

गर्द अंधा‍-या वाड्यामध्ये... पिशाच्चांचा राडा
असा गावाच्या वेशीबाहेर.. म्हातारीचा वाडा

म्हातारीच्या वाड्यात म्हणे...
सत्तावन्न खोल्या
सावल्यांनी भरलेल्या अन
र‍‍क्‍तानं त्या ओल्या

गेला कोणी वाड्यामध्ये
तर येणे परत नाही
आणखिन एक सावली वाढे,
तरी खोली भरत नाही

वाड्यामधल्या हरेक खोलीत
येतो म्हातारीचा वास
कधी ऐकु येते किंकाळी
कधी पुटपुटण्याचा भास

आमोशाच्या रात्री इथं
कुणी बाळ रडत असतं
वाड्यामागचं झाड वडाचं
दात विचकुन हसतं

कुबट कुजगट म्हातारीची
जळलेली कातडी
बाहेर लोंबता.. फुटका डोळा
अन मान जरा वाकडी

हळद कुंकु... मिरच्या लिंबु
पसरलं असतं घरभर
चिमुरड्यांच्या रक्तासाठी
चटावलेलं तळघर

तळघरात ह्या खेचुन नेतो
सरपटणारा पंजा
कोवळ्या जीवावर ताव मारतो
अतृप्त अघोरी मुंजा

सळसळणा-या जिभाच काढी खळखळणारा ओढा
असा गावाच्या वेशीबाहेर.. म्हातारीचा वाडा

एक पोर चिमुकली.. रस्ता चुकली
खेळत गेली वाड्याकडे
हे बघणा-या गावक-याच्या
जीवाचा थरकाप उडे

पोर ती वेडी.. ओढली गेली
हडळीच्या अमलाखाली
ओलांडुन उंबरा वाड्याचा
भारावुन ती आत निघाली

घाबरुन ...तरी धीर धरुन
आत गावकरी शिरला अंती
लागत गेले दरवाजे अन
खसखसली ती तटबंदी

बाधीत ती... संमोहीत ती
जीव निरागस भूल पडे
गावक-याला दिसला पंजा
सरपटताना तिच्याकडे

कुजबुजले कुणी खोल्यांमधुनी
होणार वाटते घात हिचा
तो धावला जीवाच्या आकांताने
धरुन ओढला हात तिचा

पण क्षणात त्याचा जीव गोठला....

क्षणात त्याचा जीव गोठला
श्वासाचा चोळामोळा
त्या चिमुकलीला नव्हता पंजा
लोंबत होता.... फुटका डोळा

चेकाळत मग आला पंजा
सावल्या लागल्या फेर धरु
होऊन चिमुकली, म्हातारीने
पचवले शेकडो वाटसरु

पुन्हा विचकले दात वडाने, हसला रक्‍तपिपासु ओढा
असा गावाच्या वेशीबाहेर.. .....म्हातारीचा वाडा

धुंद रवी


सूर्य


santoshi.world

aai ga .............. chhan aahe kavita ...........

rudra


Parmita