शेतकरी दिवस

Started by sanjay limbaji bansode, June 22, 2015, 03:37:59 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

झाला झाडू दिवस
झाला योगा दिवस
कधी येतोय साहेब
आमचा शेतकरी दिवस !!


पन्नास किलोची गोणी
बघा उचलून डोक्यावर
तीन तीन हांडे पाणी
आणून दाखवा डोक्यावर !


शेतकऱ्याच्या सूखासाठी
करा एकदा नवस
कधी येतोय साहेब
आमचा शेतकरी दिवस !!


पोटाची खळगी तुमची
ठेवा जरा उपाशी
शीळी भाकर खा आमची
नका खाऊ तुपाशी !


आमच्या बापासारखा
काढा एकतरी दिवस
कधी येतोय साहेब
आमचा शेतकरी दिवस !!


नांगर धरून शेतात
चालवून दाखवा दिवसभर
गळक्या पत्राच्या घरात
राहून दाखवा रातभर !

बिना लाईटची बघा
आमची रोजची अमावस
कधी येतोय साहेब
आमचा शेतकरी दिवस !!


विधवा झालेली शेतकरीन
बघा तिचे हाल
शेतात राबणारी मोलकरीन
घरावीना बेहाल !


तिचेही येऊद्या साहेब
एकदा सुगीचे दिवस
कधी येतोय साहेब
आमचा शेतकरी दिवस !!


कवी - संजय बनसोडे
9819444028