छोट्या छोट्या गोष्टी

Started by Nitesh Joshi, June 23, 2015, 10:46:34 PM

Previous topic - Next topic

Nitesh Joshi

अजूनही आठवतोय तो दिवस . . . बुधवार . . . नुकतीच सॅलरी वाटपाची तारीख संपलेली असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. महिन्यातले पहिले १० दिवस प्रचंड गर्दीला सामना करत ११व्या दिवशी जरा रिलॅक्स मूड मध्ये काम चालू असतांना १ आजोबा साधारण ६५ ते ७० वय असलेले समोर आले आणि म्हणाले साहेब जरा पासबुक प्रिंट करून देताल का? अगदी नम्रपणे केलेली विनवणी बघून मी लगेचच त्यांचं काम करून दिल. थोडा वेळ पासबुक चाळून त्यांनी माझ्याकडे बघून १ प्रश्न केला " सर तुम्हाला माहितीये मी आज का प्रिंट करून घेतलं पासबुक?" साहजिकच मला माहिती नव्हती कि खरच काय कारण असेल पण आता मात्र मला उत्सुकता लागली होती कि खरच असं कोणत कारण असेल कि त्यांनी आज पासबुक प्रिंट केलं. उत्तर जरा अनपेक्षितच होतं "सर मी आत्ता बाहेर जाऊन ATM मधून काही रक्कम काढली आणि लगेच आलो तुमच्याकडे. खरं तर मला गरज नव्हती आज पैश्यांची पण आज असलेली तारीख मला प्रिंट झालेली हवी होती आणि त्यासाठीच मी एवढी सगळी मेहनत केली." ती तारीख होती ११.१२.२०१३. मग त्यांनी काही मागच्या तारखा ज्या त्यांनी अश्याच पद्धतीने प्रिंट करून घेतल्या होत्या त्या दाखवल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला. गोष्ट खूप छोटी होती पण किती आनंद देऊन गेली होती त्यांना. . . आणि तेव्हा कळाल कि छोट्या छोट्या गोष्टीत जो आनंद असतो त्याचा आस्वाद आपण मोठ्या गोष्टी मिळवण्याचा नादात घेऊच शकत नाहीये.
परवा गप्पा चालू असतांना आमच्याच ब्रांच मधले १ वरिष्ठ प्रबंधक म्हणाले कि खूप मोठ्या गोष्टींच्या मागे पळू नका, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला विसरू नका. फक्त महागड्या हॉटेल मध्ये गेल्यावरच बायको खुश होते असं काही नाही. रिमझिम पावसात हातात हात घेऊन जुन्या गप्पा गोष्टी करत फिरण्यात आणि मधेच कुठेतरी गरम वाफाळलेला चहा घेण्यात जी मजा आहे ना ती नाही मिळणार तुम्हाला कुठेच. खरच खूप खोलवर मनात कुठेतरी घर करून गेली ती गोष्ट. किती अश्या गोष्टी असतात कि ज्यामध्ये आनंद दडलेला असतो पण आपण तो उलगडूनच बघत नाही कधी.
१०वी ची परीक्षा संपली कि कॉलेज लाइफ बद्दलची उत्सुकता असलेली तरुणाई कॉलेज सुरु झाल्यापासून सतत कोणाच्या न कोणाच्या शोधात असते (प्रियकर / प्रेयसी). त्यासाठी दिवस रात्र खटाटोप करत असते. १ होकार किवा I LOVE YOU ऐकण्यासाठी तासंतास वाट बघत असते पण आपण हे विसरतो कि घरी आई बाबा ताई दादा आजी आजोबा हे सार्वजन पण असतात त्यांना तुम्ही स्वतःहून म्हणून बघा I LOVE YOU. तो किवा ती होकार देईलच असा नाही, I LOVE YOU म्हनेलाच असा पण नाही. पण आई बाबा ताई दादा आजी आजोबा हे नक्कीच तुम्हाला सकारात्मक उत्तर देतील. घेऊन बघा या पण छोट्याशा गोष्टीतला आनंद.
मुंबई आणि लोकल यांच अतूट असं नात आहे. लोकल शिवाय पर्यायाच नाही अस जरी म्हणालो तरी फारस वावगं ठरणार नाही. असाच १ दिवस लोकल मधून जात असतांनाचा हा प्रसंग. दादर स्थानकावरून १ जण हातात काहीतरी घेऊन चढला. सकाळची वेळ होती म्हणून फारशी गर्दी नव्हती. समोरच त्याला जागाही मिळाली. हातात असलेली पिशवी सोडून त्यांनी नाश्ता केला. आणि खिडकीतून ती पिशवी बाहेर टाकणार इतक्यात बाजूचा माणूस (अशिक्षित) त्याला म्हणाला कि साहेब का कचरा करताय बाहेर? जवळच ठेवा न ते आणि स्टेशन आला कि द्या टाकून कचर्याच्या डब्ब्यात. रोज १० लाख मुंबईकर प्रवास करतात हो लोकल मधून त्यापैकी १ लाख लोकांनी जरी असा कचरा फेकला तरी किती कचरा जमा होतो याचा अंदाज लावा ना. त्यामुळे बर्याच गोष्टींना समोर जाव लागत दररोज आपल्याला. ह्याच काचर्यामुळे बऱ्याचदा लोकल वेळेवर धावत नाहीत, आणि आपण परत रेल्वे प्रशासनाला यासाठी जबाबदार समजतो. खरच खूप छोटी गोष्ट होती पण खूप मोठा धडा शिकवून गेली. येता जाता लोकल मध्ये बरेच शिकले सावरलेले माणसं पण सर्रास कचरा बाहेर टाकतात. खरच काय कामाच तुमच हे शिक्षण? जर ह्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला कोणी अशिक्षित समजून सांगत असेल तर. कृपया या गोष्टीची दाखल घ्या आणि स्वतःहून पुढे या. प्रत्येकानी फक्त १ करा, आपल्यासोबत १ छोटीशी पिशवी ठेवा आणि त्यात सगळा कचरा टाका आणि स्टेशनवर उतरल्यास कचर्याच्या डब्ब्यात टाका ज्यामुळे फक्त मुंबईच नाही तर आपला भारत देश स्वच्छ ठेवायला मदत होईल.