आमचा बाप आणि आम्ही

Started by Maha Ravindassa, June 24, 2015, 11:29:35 AM

Previous topic - Next topic

Maha Ravindassa



जन्म झाला माझा तेव्हा दुनिया इवल्याश्या डोळ्याने पाहिली
समजू लागले तेव्हा मान हि भीमा तुझ्या पुढेच झुकली
जन्म जरी दिला असला आई  वडिलांनी आम्हाला
बाप म्हणून बाबासाहेब  तुम्हीच नटवले या जीवनाला ।। धृ ।।
जेव्हा नव्हती मुभा निसर्गनिर्मित पाणी पिण्याची
तेव्हा आमच्या हक्कासाठी लढाई लढलात चवदार तळ्याची
धर्मशास्त्रात आम्हाला कधी जागाच नव्हती सन्मानाची
बाबा तुमच्या मुळे आज पदवी भेटली आहे राजाची
लोकशाही ने तुम्ही नटविले ता भारताला
बाप म्हणून बाबासाहेब  तुम्हीच नटवले या जीवनाला ।। १ ।।
शिक्षणाची बंदी अनेक वर्षे केवळ याच समाजावर
कायद्याने शक्ती केली शिक्षणाची याच भारत देशावर
जेव्हा नव्हता कोणता अधिकार  या मानवी जीवनावर
बाबा तुमच्या लेखणीने उपकार केले या बहुजणावर
जन्म नसता बाबा तुमचा झाला तर किंमत नसती या जगण्याला
बाप म्हणून बाबासाहेब  तुम्हीच नटवले या जीवनाला ।। २ ।।
मनुस्मृतीने माणूस म्हणूनच नाकारले प्राण्याहून हि नीच जन्म आमचा
संविधानाने आज हक्क मिळतो मान सन्मानाचा
नव्हता कोणताच अधिकार आम्हाला त्या मानवी मुल्यांचा
कायद्याने दिला अधिकार बाबा तुम्ही त्या मानवी जीवनाचा
नसते बाबा तुम्ही जन्मले काय असता अर्थ  या आमच्या जन्माला
बाप म्हणून बाबासाहेब  तुम्हीच नटवले या जीवनाला  ।। ३ ।।
जन्म जरी आई च्या उदरात झाला तरी जीवन तुमच्याच नावाने उदयास आले
वर्षानुवर्षे केलेल्या गुलामीचे आता सारे अर्थ कळाले
माणूस म्हणून अधिकारच नव्हता जगण्याचा अर्थ मिळाला तुझ्या जन्मामुळे
भारत भुच्या बहुजनाला  किंमत केवळ बाबा भीमा तुझ्यामुळे
आई बाप म्हणून तुझीच ओळख आहे या बहुजनाला
बाप म्हणून बाबासाहेब  तुम्हीच नटवले या जीवनाला   ।। ४ ।।
बापाच्या भूमिकेत सगळे बाप होते पण तू निराला बाप ठरला
कोटी कोटी लेकरांचा सांभाळ करणारा तू जगाच्या मनात भरला
असंख्य झाले या भूमीवरती बाप म्हणून तू एकटाच दिसला
जगाच्या पाठीवर इतक्या लेकरांचा बाप तू पहिला
नाते आमचे तुझ्याशी बाप लेकाचे आज दशकानु दशके मिळते पाहण्याला
बाप म्हणून बाबासाहेब  तुम्हीच नटवले या जीवनाला  ।। ५ ।।

भीमरत्न सावंत