रहस्य

Started by anuswami, June 24, 2015, 01:38:50 PM

Previous topic - Next topic

anuswami

रहस्य



प्रेम करायच नव्हत कधीच
पण भावनांची घुसमट त्याला सहवेना
जग बोल लावत तिला उगाचच
पण त्याला तिच्यावाचून काय रहावेना



तिच्यासोबत बोलताना तो
उगाच बालिशपणाचा आव आणायचा
ती पण सावरून घ्यायची त्याला
कारण तो तिच्या मनीच गुपित जाणायचा



रंग भरायची ती तिच्या प्रेमरांगोळीत
अन हा वेडा तिला बघतच रहायचा
लाजेने लाल लाल व्हायची ती
नाही म्हणायचा पण हा तिच्या प्रेमात झुरायचा



तिच सहसा कुणाशी पटायच नाही
हा प्रेमवेडा मात्र तिच मन ओळखायचा
आंधळा नव्हता तिच्या प्रेमात
पण सर्वस्व अर्पणाची ती भावना मात्र जपायचा



प्रेमाचे हे क्षण जपत जपत
ती त्याच्या खुप खुप जवळ आली
मनाचा उडाला गोंधळ त्याच्या
निराश होऊन ती पुन्हा दूर गेली



मध्यंतरी काही वेगळच घडल
पण त्यानं नाही तोडला तिचा विश्वास
तुटणार तरी कसा तो
जीव होता त्याचा 'ती' अन तो तिचा 'श्वास'



प्रेमाचा हा लपंडाव चालू होता
पण शेवटी घडायच ते घडून गेल
इतक्या प्रेमाने सांभाळलेल हे पाखरू
काल भुर्रकन घरट्यातून उडून गेल



नाशिबाला न जुमानणारा हा प्रेमाचा खेळ....
तिला आठवून हे वेडं काल रात्रभर रडलयं
कारण पावसाच्या त्या समानार्थी शब्दात........
खूप मोठ 'रहस्य' दडलयं......



कवी :- अनिकेत स्वामी, अकलूज.
९५५२०३०८२८