**पावसात भिजता भिजता**

Started by धनराज होवाळ, June 24, 2015, 01:57:48 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

काहीतरी लिहायचं होतं,
पण काहीच सुचत नव्हतं..
विचारांची सांगड घालताना,
मन शब्दच वेचत नव्हतं..!!

अचानक विजा कडाडल्या,
अन् पाऊस बरसू लागला..
पावसाला पाहून माझा हात,
लिहायला तरसू लागला..!!

मी असाच फक्त लिहीत गेलो,
लोकं त्याला वाचत गेले..
मी शब्दांचे बीज पेरत गेलो,
लोकं कवितेचे फुल वेचत गेले..!!

कवितेमध्ये शब्दांपेक्षा,
भावनाच जास्त दिसू लागल्या..
पावसामध्ये तुझ्या आठवणी,
इतिहास घेऊन हसू लागल्या..!!

तुझ्या आठवणींच्या या पावसात,
मी ही मग आनंदाने खेळू लागलो..
तुझ्या आठवांचा प्रत्येक थेंब,
चेहऱ्यावर उत्साहाने झेलू लागलो..!!

या पावसात भिजता भिजता,
कविता तयार कधीच झाली होती...
पावसातल्या थेंबात अन् कवितेच्या शब्दांत,
तुझ्या आठवणी घेऊन आली होती...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
पलुस, जि. सांगली
9970679949


धनराज होवाळ

खुप खुप धन्यवाद मॅडम... :)

मिलिंद कुंभारे


धनराज होवाळ

 :) धन्यवाद मिलींद सर...