तुच सांग प्रेम कस करायचं

Started by vinitpatil, June 24, 2015, 07:03:09 PM

Previous topic - Next topic

vinitpatil

सांग प्रिये प्रेम कस करायचं
ना तू काही बोलायचं
ना मी काही बोलायचं
हे अस किती दिवस चालायचं..!

तू मला खिडकीतून पाहायचं
मी उगाच आरश्यासमोर उभ राहायचं
सांग प्रिये प्रेम कस करायचं ..!

तू टेरेसवर कपडे सुकवायला यायचं
तुला पाहून मनाला तेवढच समाधान द्यायचं
सांग प्रिये प्रेम कस करायचं ..!

दिवस भर निरागसपने तुला पहायचं
तुलाच मनात साठवायच
रात्री झोपेत तुलाच स्वप्नात पहायचं
ना तू काही बोलायचं
ना मी काही बोलायचं
फक्त आणि फक्त एकमेकांना पहायचं ..!

सांग हे अस किती दिवस चालायचं
तूच सांग प्रिये प्रेम कस करायचं ..!

विनित ....