**माहित नाही का ?..... **

Started by विजय वाठोरे सरसमकर, June 26, 2015, 08:16:24 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

  माहित नाही का ...........

का ती ढगांची चाळ
तो चंद्र त्रस्त आहे
माहित नाही का
आज मी तुझ्यावर फिदा आहे ?

समजावलं मी खूप स्वतःला
पण मन का कधी सावरत आलं आहे
तुझ्या त्या हृदयस्पर्शी नयनात
पाहानच माझा गुन्हा झाला आहे .

कधी जो स्वतःवरही नव्हता
असा तो विश्वास आहे
म्हणूनच तर तुझ्यासाठीच
केला मी दुनियादारीचा घात आहे

तुझी ती मनमोहक अदा
मला आज फसवत आहे
तुझ्या त्या गुलाबी गालांना
नकळतच स्पर्श करत आहे

स्वप्नातही तुझ्याच प्रीतीचे
गोड रूप आहे
माहित नाही का
आज मी तुझ्यावर फिदा आहे ?

                      विजय वाठोरे सरसमकर
                      9975593359

विजय वाठोरे सरसमकर