$ पहिलं वहिलं प्रेम $

Started by विजय वाठोरे सरसमकर, June 26, 2015, 08:48:16 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$ पहिलं वहिलं प्रेम  $

पहिलं वहिलं प्रेम
कधी मरत नसत
नवचैतन्यासारख ते
ध्यानी मनी असत 

म्हणूनच जीवनात
हसण्याच कारण प्रेम असत
त्यामुळे होणाऱ्या विरहाने
रडणार ते प्रांजळ मन असत

मनातील होणाऱ्या भावना कल्लोळाच
ते प्रतिबिंब असत
सोप नसत इथे प्रेमी होण
त्या शपथांना खर ठरवन.

देहाच्या मागे धावणारेबहु दिसतील
पण खर प्रेम करणारे क्वचितच आढळतील
म्हणूनच तर आयुष्यात तेच नशीबवान असतात
ज्यांना प्रेम मिळत असत

पहिल्या प्रेमाची संगतच
जीवनात प्रेरणा देत असत
आठवणींच्या आठवणींना स्मरण
हेच तर प्रेम असत

पहिलं प्रेम यात विश्वास
हेच मूळ असत
आणि त्या अतूट विश्वासावरच
पहिलं प्रेम निर्भर असत

जातो जेव्हा या विश्वासाला तडा
तेच मन पुन्हा प्रेम करायला धजत नसत
म्हणूनच ते दयनी मनी अंतरी
पुन्हा पुन्हा स्मरत असत

पहिलं वहिलं प्रेम
कधी मरत नसत
म्हणूनच तर ते
पुन्हा पुन्हा स्मरत असत .

                   विजय वाठोरे सरसमकर
                      9975593359

विजय वाठोरे सरसमकर