विझली मशाल पेटव

Started by sanjay limbaji bansode, June 29, 2015, 07:17:08 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

विझली मशाल पेटव
रण  पुरोगामी  उठव
फुले  शाहू  आंबेडकर
कार्य त्यांचे मनी आठव
विझली मशाल पेटव !!


प्रेम ठेव मनी
कर समतेची पेरणी
एकीची कर करनी
एकतावाद जगी उठव
विझली मशाल पेटव !!


शीलाचा तू शीलदार
शिवबांचा करजदार
भिवाचा वारसदार
लेखणी पुन्हां उमटव
विझली मशाल पेटव !!


बुद्ध कबीर आणी फुले
त्यामुळे माणुसकी डोले
संजय ही मनी बोले
पुन्हां विचार त्यांचे आठव
विझली मशाल पेटव !!


संजय बनसोडे
9819444028



jitendra gaikwad


sanjay limbaji bansode


विजय वाठोरे सरसमकर

खूपच छान कविता संजय सर .

जय भीम .

suraj choudhari

khupch mast kavita sir ... Kharch lai bhari ....... Jay bhim sir .........

sanjay limbaji bansode

धन्यवाद मित्रांनो

siddheshwar vilas patankar

संजय , मी डॉक्टर पाटणकर . मस्त कविता  आहे . एकतेची मशाल कोणीतरी पेटवायलाच हवी . निदान तुझ्या लेखणीने सुरवात झाली हे चांगले झाले. आपण सर्व कर्जबाजारी आहोत ह्या भूमीचे काहीतरी करायलाच हवं नाहीतर कुठे जाऊन पांग फेडणार आहोत देव जाणे.

शुभम भवतु

पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C