बसल्या बसल्या मनात विचार आला....

Started by NitinSK, July 01, 2015, 01:43:07 PM

Previous topic - Next topic

NitinSK

अशीच एक आवडलेली कविता ...
कवी - श्री. शिव S.K.

असाच बसल्या बसल्या एकदा
मनात माझ्या एक विचार आला...
काही वेळासाठी का होईना बाजूला काढून
ठेवता येईल का या ह्रृदयाला ????

कंटाळा आलाय तिच्या आठवणींचा आता मला
म्हटलं थोडसं विसरता तरी येईल तिला....

नंतर विचार आला..अरेच्चा !!
आठवणींच कनेक्शन तर मनाशी असतं ??
मग थोड्या वेळासाठी काढून ठेवता येईल का मनाला ??
पण एक प्रॉब्लेम झाला न राव...
या मनाचा ठावठिकाणा तरी माहीत आहे का कुणाला ???

बरं मला नेमकं हे कळतंच नाही...
हे...हे...मन... आपलं कि परकं ???
काय गरज असते याला तिची आठवण काढायची प्रत्येक मिनिटाच्या प्रत्येक न प्रत्येक क्षणाला....

बरं काढली तिची आठवण...
मी म्हणतो आली तिची आठवण
तर आल्यासारखं जावं ना निघून ...
उगाच कशाला बोचत राहावं ???
मनाच्या आणि ह्रृदयाच्या प्रत्येक कणाला...

मला माहीत आहे आता तुम्ही म्हणाल,
काय अर्थ तरी आहे का या कवितेला...
उगाच काहीतरी खरडत जातोय हा...
हा आहेच वेडा... फार फार तर तिच्या प्रेमात वेडा...
पण मला सांगा तरी एकदा...
या सर्वाचा दोष द्यायचा तरी कुणाला ???

असाच बसल्या बसल्या एकदा
मनात माझ्या एक विचार आला...
काही वेळासाठी का होईना बाजूला काढून
ठेवता येईल का या ह्रृदयाला ????