आनंदाचे डोही

Started by शिवाजी सांगळे, July 02, 2015, 10:46:01 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आनंदाचे डोही...

   मला राग येतो अशा लोकांचा, जे लोक स्वत:चे खरे नाव न वापरता नावं बदलून सोशल साईटवर आपला प्रोफाईल तयार करतात, आपल्या व्यतिरीक्त दुस-याचे वा मालिका, चित्रपटातील लोकांचे फोटो स्वत:चा प्रोफाईल फोटो ठेवतात.

   ओळख दाखवली तर इतर लोक काय म्हणतील? मला नाही आवडत खरं नाव टाकायला? वगैरे सारखे प्रश्न कदाचित त्यांना सतावीत असतील?

   अशा वेळी मी म्हणतो, ओळखच लपवायची आहे तर सोशल साईटवर लिहिता कशाला? असा पळपुटेपणा चांगला आहे का? स्वत:च स्वत:ला फसवायचं सोबत ईतरांना पण फसवायचं. काय गरज आहे असं करायची?

   पुर्वीही बरेच लेखक/कवी टोपण नावाने लिहीत, परंतू आपली ओळख लपवित नसत उदा. कै.माणिकराव गोडघाटे, उर्फ "ग्रेस"  कै. विं.दा. करंदिकर उर्फ "विंदा" व हल्लीचेच उदाहरण म्हणजे कवी, अभिनेते किशोर कदम उर्फ "सौमित्र"  हे सुध्दा टोपण नावाने लिहीतात महत्वाचं हे कि त्यांना स्वत:च्या लिखाणावर / कामावर विश्वास असायचा व आहे, यांना आपली ओळख कधी लपवावीशी नाही वाटली.

   आजचा काळ थोडा वेगळा व वेगवान आहे, सोशल नेटवर्कींग साईटवर आपण नविन मित्र जोडु शकतो त्या व्दारे आपले विचार / मनोगत / मते इतर शेअर करू शकतो, वैचारीक देवाण-घेवाण होउ शकते. त्या साठी समोरच्या व्यक्तिची ओळख पटणे महत्वाचे आहे.

   ओळखीतूनच आपला स्वभाव दुस-यांना समजतो व गैरसमज होत नाहीत. जबाबदारी समजुन घेता येते व विचारात ठामपणा येतो, आणि त्यामुळे समोरच्यांना तुमच्या बध्दल आदर व विश्वास निर्माण होतो.

   जर तुमचा हेतू शुध्द आहे, माता, भगीनीं बध्दल आदर आहे तर स्वत:ची ओळख लपवु नका, मोकळेपणाने लिहा स्वत: आनंद घ्या व ईतरांनाही आनंद वाटा नि:शुल्क वाटता  येणारी हिच एक गोष्ट आहे, मग पहा जीवनात कसे तरंग ऩिर्माण होतात आनंदाचे....


=शिवाजी सांगळे, बदलापूर,जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९