नकली चेहरा

Started by शिवाजी सांगळे, July 02, 2015, 10:48:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नकली चेहरा

"क्या मिलीये ऐसे लोगों से, जीनकी फितरत छुपी रहे,
नकली चेहरा सामने आये, असली सुरत छुपी रहे।" चित्रपटःइज्जत 1968

हे गाण ऐकत असता मला प्रकर्षाने एक जाणवले कि प्रत्येक व्यक्तिला परमेश्वराने एक छान चेहरा व रंगरूप दिलेले आहे, फेस बुक व त्या वरील वेगवेगळया ग्रुप मधे असे अगणित चेहरे दिसतात, काही ओळखीचे काही अनोळखी.

पण काहीं बाबत असं होतं कि चेहरा ओळखीचा नसला तरी नाव ओळखीचे असते, इतर माहीती बरोबर असते, खुपदा वेगळीच नावे व फोटो असतात असं का? नेहमी पडणारा हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच.

काहि मंडळी आपली ओळख लपवून कामे करतात, गोंडस/छान छान पोस्ट टाकुन इतरांना आपल्या जाळयात ओढतात, आणि सुरू होतो एक मनस्ताप देणारा प्रवास. नवथर मंडळीना याचा फारच धोका होउ शकतो, इंटरनेटच्या मायाजालात नित्य नवे शोध/बदल होत असतात, त्या नुसार उपद्रवी लोक सुध्दा नव्या नव्या क्लृप्ती शोधत असतात, कुणाची वैयक्तिक माहिती घेउन तीचा गैरवापर करणे, एखादयाची कलाकृती स्वतःच्या वा दुस-याच्याच नावे टाकणे या पासून ते एखादयाची आर्थिक हानी होई पर्यंत काहिही होउ शकते.

हे सारं रोखायला कायदा आहे, परंतू अपुर्ण ज्ञान व किचकट प्रकियेमुळे सर्व सामान्य हतबल होतो. या साठी एकच सावधानता बाळगायला हवी कि येणे-या प्रत्येक रीक्वेस्टची बारकाईने वयक्तिक शहानिशा करणे आवश्यक व्हावे. तसेच सर्व ग्रुप संचालकांवर विश्वास ठेवुन व अवलंबुन इतर लोक ज्वाईन होतात, तेंव्हा अशा संचालकांची जबाबदारीपण फार वाढते. अशा वेळी ग्रुपमधी कुणा सभासदाची बदनामी/निर्भस्तना झाली तर सर्व जबाबदारी संचालकांवर येऊन पडते, नुकताच असा अनुभव एका ग्रुप संचालकाला आला आहे.

अशा वेळी ग्रुप संचालकांनी होणा-या प्रत्येक मेंबरची माहिती तपासुनच त्याला सभासदत्व दयायला हवे, त्या नंतर जरी असे काही घडले तर त्याचे निलंबन करून त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. ग्रुप संचालकांनी व प्रत्येक सभासदाने स्वतःची व ग्रुपची काळजी घेउन हया मायाजालात टिकून राहून समाजाला हीतकारक व उपयुक्त पोस्ट कराव्यात हि माफक अपेक्षा आहे.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९