* विसरली रे ती *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 03, 2015, 08:41:18 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* विसरली रे ती *
ना काही बोलतो
ना कोणाशी भांडतो
दु:ख मनात ठेऊन
रस्त्याने एकटाच चालतो

शब्द तिचे आठवतो
ञास मनाला होतो
माझ्या जखमांना आता
मीच कुरतडत असतो

वेड्या वेदनांना सारखा
मी समजवत असतो
विसरली रे ती
अन रडत असतो

मग पुन्हा हसण्याचा
डाव खेळत बसतो
आतुन माञ नेहमीच
सारखा विव्हळत असतो.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938