* जीवापाड प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 07, 2015, 02:14:15 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* जीवापाड प्रेम *
खर सांगु का तुम्हाला
स्वप्न तस माझंही होतं
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं
कोणीतरी मलाही हवं होतं

तिला पाहुन वाटल मला
स्वप्न सत्यात उतरल होत
होतं नव्हत सार सर्वस्व
तिने मलाच अर्पणच केल होतं

स्वप्नांच्या गावातुन आलेल्या सोनपरीने
मलाच तेवढं निवडल होतं
जणु काही तिने माझं
जगच बदलुन टाकल होतं

स्वार्थी या जगात मला
तीनेच जवळ केल होतं
इतक जीवापाड प्रेम तिने
फक्त माझ्यावरच केल होतं.
कवी-गणेश साळुंखे.