येशील कधी सांग पावसा

Started by Ravi kamble, July 13, 2015, 09:33:50 AM

Previous topic - Next topic

Ravi kamble

* येशील कधी सांग पावसा *

पैसं नव्हतं आणाया ट्रॅक्टर
माझी बायडी जुंपली नांगराला
रगतानं भरलं बाचं हात
दिवस रात्र फोडून ढेकळाला

व्हत नव्हतं भंगारात इकलं
खत पेरणीच्या वगुताला
काळीज फाटल बा मेल्यावर
टाच आली पोराइच्या शाळंला

करपुन चाललय रान संमद
येशील कधी सांग पावसा
नको करू एवढा अत्याचार
झालाय जीव हा नकोसा

सरणासाठी माझ्या लाकडं
लागलोय आताच तोडाया;
आयपत नाही म्या गेल्यांवर
मैतीच माझ्या कर्ज फेडाया;

(रविंद्र कांबळे पुणे ९९७०२९१२१२)
  (वेळ ७वा २० मी दि.८/७/२०१५)