साथ मला देशील तू.......

Started by mangeshmore111, July 16, 2015, 01:20:57 PM

Previous topic - Next topic

mangeshmore111

( तू ) जाणून घेऊ इच्छितेस ज्या गोड मुलीवर ज्या सुंदर मुलीवर मी प्रेम करतो ती मुलगी कोण आहे? तर फक्त कंसातील शब्द वाच तुला उत्तर मिळेल
   
साथ मला देशील तू.......

गाण्यातला सुर तू
शब्दातला अर्थ तू
सांग माझी होशील तू
साथ मला देशील तू

नयनातील स्वप्न तू
हृदयाची स्पंदन तू
श्वासातला श्वास तू
नव्या जगाची आस तू
सांग माझी होशील तू
साथ मला देशील तू

उगवती किरण तू
अंधारातला प्रकाश तू
जगण्याची प्रेरणा तू
जगण्याचे कारण ही तू
सांग माझी होशील तू
साथ मला देशील तू

विचारातील विचार तू
तर्काचा निष्कर्ष तू
प्रश्नांचे उत्तर तू
हृदयाची मुक्त साद ही तू
सांग माझी होशील तू
साथ मला देशील तू

हास्यातील हास्य तू
वेदनांचे औषध तू
फुलातला सुगंध तू
सांग माझी होशील तू
साथ मला देशील तू

मंगेश मोरे
८९८३०३५०८८