दुष्काळ तुझ्या प्रेमाचे.....

Started by dattarajp, July 16, 2015, 10:43:21 PM

Previous topic - Next topic

dattarajp

दुष्काळ तुझ्या प्रेमाचे....

दुष्काळ तुझ्या प्रेमाचे
आज पडू लागले .
थर थरत हाथ माझे
त्या प्रेम अवकाशा कडे चालले.

तू आज तरी गरजशील.
तू आज तरी बरसशील.
माझ्या मनास आवरशील.
माझ्या मनास सावरशील.

दुष्काळ तुझ्या प्रेमाचे
मला छळू लागले.
माझे प्रेम अंकुर ते
आज जाळू लागले.

आठवण तुझी काढताच
डोळे भरू लागले.
तुझ्या सोबतचे ते जुने
क्षण आठवू लागले.

दुष्काळ तुझ्या प्रेमाचे
आज का पडू लागले.
माझ्या प्रेमाचे सरोवर
तुझ्या वीणा का अट्टले.

दुष्काळ तुझ्या प्रेमाचे
आज का पडू लागले.
तुझ्या विन जगणे
कठीण हे मला कळाले.

                 बबलू
          9623567737